Tuesday, June 28, 2022

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आता आणखी एक गेम...भाजपकडून सूचक मौन ; प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू दाखल करणार अविश्वास ठराव...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी आता आक्रमक चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मोठा विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सूचक मौन बाळगले जात असताना दुसरीकडे लहान पक्ष अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास मत ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, हा ठराव भाजप मांडणार नसून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू दाखल करणार आहेत. 

बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांचे विधानसभेत त्यांच्यासह दोन सदस्य आहेत. येत्या दोन दिवसांत बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन अविश्वास मत ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र सादर करणार असल्याची माहिती आहे. या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. सुप्रीम कोटातील सुनावणीनंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत भाजप नेत्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

No comments:

Post a Comment