वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच मोजकेच मंत्री आणि आमदार उरले आहेत. यादरम्यान राज्यातील या राजकीय परिस्थितीवरुन अनेकांनी निरनिराळे ट्विट करत राजकारण्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनीही शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, 'शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती. पण, "बाबा ओरडतील" म्हणून नाही आला.' अमेय खोपकर यांच्या या ट्विटचा रोख हा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दिशेनं आहे. याशिवाय आणखी एक ट्विट करत खोपकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. 'एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव शिवसेनाऐवजी "शिल्लक सेना" करून घ्यावं' असा खोचक सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
No comments:
Post a Comment