Sunday, June 19, 2022

दिपक बेलवलकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ; कराडात ट्रेकिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली जाणार असल्याची खासदार श्रीनिवास पाटील यांची यावेळी घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - येथील प्रीतिसंगम सायकल ग्रुपचे संस्थापक दीपक बेलवलकर यांनी नुकतीच बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, पंच केदार, पंच बद्री, पंच प्रयाग यात्रा आपल्या दहा सहकार्‍यांसह पूर्ण केली आहे. यानिमित्त दिपक बेलवलकर मित्र परिवाराकडून दिपक बेलवलकर यांना सहकुटूंब खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. 
यावेळी अर्बंन कुटूंब प्रमुख सुभाषराव जोशी, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह दिपक बेलवलकर यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिपक बेलवलकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकवर्गणीतून ट्रेकिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली जाणार आहे असे जाहीर करून टाकले.. .

No comments:

Post a Comment