वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४६ आमदारांचा गट तयार झाल्याचा दावा केला आहे. आता महाविकास आघाडी सरकारकडे एकच पर्याय उरला आहे. महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त देण्याचा प्रस्ताव मांडू शकते. पण, याचा निर्णय हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हातात असणार आहे. राज्यपालाचं अंतिम निर्णय घेऊ शकतात.
हे आघाडी सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे
No comments:
Post a Comment