वेध माझा ऑनलाइन - येथील वाखाण परिसरात आज मोकाट कुत्र्यांने एका चिमुकल्यावर अचानक हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजवीर ओव्हाळ (वय वर्षे 3) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलाचे आई वडील मोलमजुरी करतात व ते वाखाण परिसरात राहतात दरम्यान राजवीर हा दुपारच्या सुमारास त्याठिकाणी खेळत असता तेथील मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला जखमि केले या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला
दरम्यान शहरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणुन उद्या 11:00 वाजता नगरपालिकेत मुख्याधिकारी डाके याना जाब विचारायला शहरांतील अनेक सामाजिक कार्यकर्ते जाणार आहेत व या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढा अन्यथा
रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची कल्पनाही देणार आहेत असे समजते
No comments:
Post a Comment