Monday, June 27, 2022

एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत ; संजय राऊत यांची भाषा नरमली...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे हे अजूनही शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांवर कारवाई करण्यास 11 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. पण आता कालपर्यंत एकनाथ शिंदे गटावर टीका करणारे संजय राऊत आता मवाळ झाले आहे.
'गुवाहाटीमध्ये आमदार बसले आहे. त्या आमदारांना आता 11 जुलैपर्यंत मुक्काम वाढवावा लागेल. त्यांना झाडी, डोंगराचा आनंद घ्यावा लागेल. कोर्टाचा महत्त्वाचा आदेश आहे.  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, आम्ही अजूनही त्यांना बंडखोर म्हणायला मानत नाही. त्यातील अनेक जण संपर्कात आहे. त्यांचे कुटुंबीय आमच्याशी संपर्क करत आहे. त्या लोकांना ज्या परिस्थितीत ठेवलं आहे, ती परत येतील असा आम्हाला विश्वास आहे' असं राऊत म्हणाले.

No comments:

Post a Comment