वेध माझा ऑनलाइन - दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट वेगाने सुरू आहे. 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या 160-180 दहशतवाद्यांपैकी 12 जूनपर्यंत सुरक्षा दलांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
काश्मरीचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, या वर्षाच्या 5 महिने आणि 12 दिवसांत ठार झालेल्या 100 दहशतवाद्यांपैकी 71 स्थानिक तर 29 विदेशी दहशतवादी आहेत. सर्व विदेशी दहशतवादी पाकिस्तानी नागरिक आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी लष्कर-ए-तैयबाला सर्वाधिक नुकसान झाले असून, त्यांचे 63 दहशतवादी मारले गेले आहेत.
जैश-ए-मोहम्मदचे 24 दहशतवादी ठार
तसेच, जैश-ए-मोहम्मद ने 24 दहशतवादी गमावले आहेत. बाकीचे अन्सार-गजवातुल हिंद आणि आय. एस. जे. के. चे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात 27 दहशतवादी मारले गेले, एप्रिलमध्ये 24, मार्चमध्ये 13, फेब्रुवारीमध्ये 7 आणि जानेवारीमध्ये 20 दहशतवादी मारले गेले. तसेच, जूनच्या पहिल्या 12 दिवसांत 9 दहशतवादी मारले गेले आहेत.
No comments:
Post a Comment