वेध माझा ऑनलाइन - राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीतही अशीच कामगिरी करण्यासाठी भाजप उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यसभेनंतर आता विधानपरिषद निवडणूकही अटळ झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोन अर्ज मागे घेतल्यानंतर आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. यात महाविकास आघाडीचे 6 तर भाजपचे 5 उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणूक होणार असून घोडेबाजाराला उत येण्याची शक्यता आहे.दरम्यान, काँग्रेस उमेदवार भाई जगताप नॉट रिचेबल येत असल्याने आघाडीचं टेंशन वाढलं आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव गर्जे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस उमेदवार भाई जगताप नॉट रिचेबल येत असल्याने आघाडीचं टेंशन वाढलं आहे.
No comments:
Post a Comment