Tuesday, June 21, 2022

'भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल ; वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांचा उद्धव ठाकरेंना थेट अलटीमेटम ; 55 पैकी फक्त 18 आमदार बैठकीला होते उपस्थित...

वेध माझा ऑनलाइन -  राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यात मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड तसेच संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची 'मन की बात' बोलून दाखवली. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट 'अल्टिमेटम' वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

No comments:

Post a Comment