Saturday, June 25, 2022

मुंबईमध्ये जमावबंदी लागू ; सोशल मीडियावर पोलिस विशेष लक्ष ठेवणार ; हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे दिले आदेश...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. याचीच खबरदारी घेत मुंबईमध्ये आता जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे.

राज्यात अभुतपूर्व असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. ठिकठिकाणी आमदारांचे कार्यालय टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा दिली जाणार आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर सुद्धा पोलिसांचे विशेष टीम लक्ष ठेवणार आहे. हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार हे आदेश जारी केले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे.

No comments:

Post a Comment