वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून निदर्शनं करत आहे तर कुठे पुतळे जाळत आहे. आता या शिवसैनिकांच्या उद्रेकाचा फटका एकनाथ शिंदे यांच्या मुलाला बसला आहे.
No comments:
Post a Comment