वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे महाराष्ट्रातील १६ आमदार सुरत विमानतळानजीकच्या मेरीएट हॉटेलमध्ये थांबले आहेत. महाराष्ट्रातील या आमदारांनी सकाळी दहाला नाश्ता घेतला. कोकणातील एका आमदाराने झोप झाली नाही म्हणून हलकाफुलका नाश्ता द्या अशी संबंधितांना सूचना केली. तेव्हा खमणीसह (खमंग) अन्य गोडधोड पदार्थांवर त्यांनी ताव मारला.
गुजरातचे भाजप अध्यक्ष व खासदार सी.आर.पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील सेना आमदारांची सोय करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी सोमवारी सायंकाळी चार वेगवेगळ्या हॉटेल्स व रिसोर्टला व्हीआयपी, सूट बुक केले आहेत. मुंबईहून रात्री शिवसेनेचे १६ आमदार सुरतकडे रवाना झाले. रात्री दीडला मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतकडे रवाना झाले.
दरम्यान सुरत विमानतळ रस्त्यावर असलेल्या मेरीएट हॉटेलला १६ आमदार थांबले आहेत. या आमदारांसाठी वेगवेगळ्या नावाने रुम बुक आहेत
पहाटेच्या सुमारास सी.आर.पाटील व एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दोघांच्या भेटीदरम्यान आमदारांना दूर ठेवण्यात आले होते. चहापान झाल्यानंतर शिंदे व पाटील एका कारने रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ आमदारही रवाना झाले.
एकनाथ शिंदेंच्या वारीमध्ये जळगाव जिल्ह्यातील चौघा आमदारांचा समावेश असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment