वेध माझा ऑनलाइन - राज्यसभेप्रमाणे विधान परिषदमध्येही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने चमत्कार घडवून आणला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार वियजी झाले आहेत.
राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीपासून मतदान कसं करायचं? इथपर्यंत तालीम देण्यात आली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमशा पाडवी, शिवसेनेचे सचिन अहिर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
No comments:
Post a Comment