Tuesday, June 21, 2022

एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू ! मिलिंद नार्वेकर सुरत ला रवाना... घेतली शिंदेंची भेट ; पण शिंदे काय म्हणाले?...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सुरतमध्ये पोहोचले आहे.

एकनाथ शिंदे आपले समर्थक आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू  मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची अट आहे की ते थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत असे ते म्हणाले आहेत...

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले आहे. या बैठकीच्या निमित्ताने किती आमदार आपल्यासोबत आहे, याची गणना केली जाईल. संख्याबळ किती आहे, हे सिद्ध केलं जाईल.  वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे 35 आमदार  असल्याची  माहिती मिळाली आहे.

No comments:

Post a Comment