वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी स्वतः माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल. राज्यापालांची एक प्रत राज्यपालांकडे देण्यात आली आहे. 30 जूनला बहुमत सिद्ध होणार आहे. राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे.
:
No comments:
Post a Comment