वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेच्या आमदारांची कुचम्बना होत होती उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कामांना प्राधान्य देताना दिसले ही खंत शिवसैनिकांनी अनेकदा बोलून दाखवली असे सांगत ज्यांच्याशी आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे लढले इथून पुढे पण त्यांच्याच विरोधात लढायचं आहे
अशा सोबत मांडीला मांडी लावून बसणे राज्यातील लोकांना आवडले नाही सत्तेदरम्यान भ्रष्टाचार पहायला मिळाला मंत्री जेलमध्ये गेले हे सगळं पाहून लोक नाराज होते निवडणूकीचा कौल जनतेने वेगळा दिला होता आणि राज्य चालवताना वेगळंच चित्र निर्माण केलं गेलं त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे असेही फडणवीस म्हणाले
दरम्यान, यावेळी होणाऱ्या नव्या मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आता यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल मी मंत्रिमंडळात असणार नाही असे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले ते मुंबई येथे जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते
भाजप चे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा व भाकिते व्यक्त केली जात असतानाच भाजपच्या वतीने स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने अनेक विश्लेषण करणाऱ्याच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत भाजपच्या या नव्या खेळीने भविष्यात आणखी काय राजकारण राज्यात घडून येणार आहे याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे
दरम्यान, आज सायंकाळी 7 30 वाजता नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेतली असेही फडणवीस यावेळी म्हणाले
No comments:
Post a Comment