वेध माझा ऑनलाइन - आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दिल्ली येथे जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी भेट घेतली. यानंतर काही वेळापूर्वी ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर आल्याचं समोर आलं आहे. यावेळी भाजपकडून बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याचं समोर आलं आहे. फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत चर्चा केली आहे.
दरम्यान सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
30 तारखेला ठाकरे सरकारची बहुमत चाचणी...
सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. याशिवाय बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांच्या याचिकेची प्रत राज्यपालांकडे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपालांनी 30 तारखेला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे, अशीही चर्चा आहे. यावेळीच बहुमत चाचणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यपालांना आज इमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भाजपकडून पत्र दिलं आहे. आणि या पत्रात राज्याच्या आताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. यावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. अशी आम्हाला अपेक्षा आहे.
फालतू विषय....
ReplyDelete