Friday, June 17, 2022

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नाही ; याचिका फेटाळली...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. यामुळे महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावं अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दाखल केली होती. मात्र महाविकासआघाडीला मोठा झटका बसला आहे. आता हा विधानपरिषद मतदान अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार याक्षी यांनी हा अर्ज फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असून त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने यापूर्वीच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment