Monday, June 20, 2022

आता शिवसेनेचे मंत्री देखील नॉट रीचेबल ; शिवसेनेमध्ये मोठी खळबळ ; ठाकरे सरकार कोसळणार ?

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे   हे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेना फुटली असल्याची चर्चा रंगली असून सरकार धोक्यात आले आहे. त्यानंतर अनेक सेनेचे आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. एवढंच नाहीतर अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे हे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकूण चार मंत्री नॉट रिचेबल आहे. एवढंच नाहीतर अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment