वेध माझा ऑनलाइन - मान्सून राज्यात कोकणात मान्सूनला सुरूवात झाली असली तरी राज्यातील काही भागात पोहोचण्यासाठी विलंब लागत आहे. दरम्यान कालपासून नंदूरबार, जळगाव, परभणी या परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याचे imd कडून सांगण्यात आले आहे. परंतु कोकणानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात मान्सूनला सुरूवात होते यंदा मात्र मान्सूनचा पाऊस या भागात झाला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी खरिपाची पेरणी करण्यासाठी थांबला आहे. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार 75 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा मान्सून लवकर दाखल होणार वेळेआधी कोकणासह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. परंतु यावेळी मान्सून तीन दिवस उशिरा सुरू झाला. 10 जूनला कोकणात पोहोचलेला मॉन्सून 11 जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला.
निम्म्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. शुक्रवारपर्यंत (ता. 17) गुजरातच्या आणखी काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागासह झारखंड, ओडिशा, बिहार काही भागातही मॉन्सून प्रगती करण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत
No comments:
Post a Comment