Monday, June 13, 2022

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सतर्क...राज्यसभेतून धडा घेत शिवसेना ताक फुंकून उचलतेय पाऊल... आमदारांना अयोध्या दौऱ्याला जाण्यास मनाई...वाचा बातमी.

वेध माझा ऑनलाइन - राज्यसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. संख्याबळ असूनही अपक्ष आमदारांची मत भाजपच्या उमेदवाराला गेली. त्यामुळे राज्यसभेतून धडा घेत विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आतापासूनच सतर्क झाली आहे.  शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर फक्त कार्यकर्तेच जाणार असून आमदारांना मनाई करण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढणार आहे. भाजपने पाच उमेदवार मैदानात उतरवले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक ही रंगतदार होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी शिवसेनेनं सावध पवित्रा घेतला आहे. अयोध्या दौऱ्यावर सेनेचे आमदार जाणार नाहीत, अशी भूमिका सेनेनं घेतली आहे.
शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फक्त अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे. त्यामुळे आमदारांना अयोध्य दौऱ्याला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व आमदार हे मुंबईमध्येच थांबणार आहे. राज्यसभेत आमदार फुटल्यामुळे शिवसेनेनं आपला उमेदवार आपल्याच बळावर निवडून आणण्याचा प्लॅन आखला आहे.

No comments:

Post a Comment