Tuesday, June 28, 2022

आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगा ; एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला आव्हान...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील असेही त्यांनी म्हटले. आज हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मागील आठवड्यांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन मध्ये वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.

No comments:

Post a Comment