Monday, June 20, 2022

नामदार शंभूराजे देसाई व आमदार महेश शिंदे नॉट रीचेबल...!!!

वेध माझा ऑनलाइन -   सातारा जिल्ह्यातील   कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई हे दोघे सध्या नॉट रीचेबल असल्याचे वृत्त आहे त्यामुळे ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गुजरात मध्ये आहेत का? हे कळणे महत्वाचे आहे

शिवसेना आमदार महेश शिंदे हे अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे समजते तर नामदार देसाई हे भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र आहेत त्यामुळे हे दोघे गुजरात मध्ये इतर नाराज आमदारांबरोबर आहेत? की इतर कुठे आहेत? याचा खुलासा होणे गरजेचे आहे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष राज्यातील या घडामोडींवर सकाळपासूनच लागून राहिले आहे

No comments:

Post a Comment