Thursday, June 30, 2022

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेत बंड होणार असल्याची माहिती 4 वेळा दिली होती!; गृहमंत्र्यांनी देखील केलं होतं सावध! ; गुप्तचर यंत्रणेकडून माहिती आली समोर... ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३९ आमदारांना घेऊन शिवसेनेमध्ये बंड पुकारला. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची माहिती कशी नव्हती? असे सवालही उपस्थितीत झाले होते. पण, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४ वेळा बंडखोरी होणार असं सांगितलं असल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला होता. मध्यंतरी हे बंड शिवसेनेकडूनच प्रायोजित असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबद्दल माहिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ४ वेळा शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहे, अशी माहिती दिली होती, अशी माहिती मिळत आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सहा वेळा पक्षात बंडखोरी होणार असल्याची माहिती दिली होती, अशीही माहिती आहे. गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment