वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे नुकतीच संपन्न झाली. सभेत पुढील पाच वर्षासाठी सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील होते. सभेत उपाध्यक्षपदी कराडच्या अशोकराव थोरात यांची तर कार्यवाह पदी एस.टी.सुकरे यांची निवड झाली आहे.
विजय नवल पाटील हे गेली 10 वर्षे महामंडळाचे अध्यक्ष होते. तत्पूर्वी देविसिंह शेखावत गोविंद भाई श्राफ, मधुकरराव चौधरी अध्यक्ष होते .दिवंगत वसंतदादा पाटील हे पहिले संस्थापक अध्यक्ष होत. विजय नवल पाटील यांनी गेली दहा वर्षे महामंडळाचा विस्तार करून शिक्षण संस्थांचे म्हणजेच विद्यार्थी,पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विजय नवल पाटील पुढील कालावधीत कार्याध्यक्ष म्हणून काम करणार असून सुप्रिया सुळे यांचे समवेत महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवून घेतील.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की शिक्षण संस्था,संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून लवकरच मुंबई येथे बैठक लावणार आहे.शक्यतो 5 जुलै 2022 व 14 जुलै 2012 ला या बैठका घेण्यात येतील.
महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून अँड.नितीन बी.ठाकरे यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार तुकाराम खांडेभराड, माजीमंत्री विनोद गुडगे पाटील ,वसंतराव घुईखेडकर, नागपुरचे रविंद्र फडणवीस, मुंबईचे मारुतीराव म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, डॉ.विनय राऊत, अनिल जोशी, पुणेचे विजयराव कोलते ,अप्पासाहेब बालवडकर, आबेदा इनामदार, शरदचंद्र धारुरकर , जागृती धर्माधिकारी,अजित वडगावकर, अशोक मुरकुटे, अमरावतीच्या कांचनमाला गावंडे, औरंगाबाद विभागाचे मिलीद पाटील ,वाल्मीक सुरासे, एस.पी. जवळकर, मनोज पाटील, नागपुर विभागाचे अनिल शिंदे, किशोर मासुरकर, विजय कौसल ,लातुरचे राम पवार, नाशिक विभागातुन कोंडाजीमामा आव्हाड, ॲड. नितीन ठाकरे ,प्रा डॉ एन डी नांद्रे, अशोकराव खलाणे , के. के. कुळकर्णी, शिवाजी माळकर , त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यांचे संस्थाचालक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment