वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रामध्ये हा शपथविधी झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.
2004, 2009, 2014 आणि 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, सत्ताबदलानंतर आलेली ही नोटीस हा फक्त योगायोग आहे का आणखी काही? असं ट्वीट महेश तपासे यांनी केलं आहे
No comments:
Post a Comment