Monday, June 13, 2022

राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार ; हवामान खात्याचा अंदाज ; कुठे कुठे होणार पाऊस?

वेध माझा ऑनलाइन - कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.अरबी समुद्राच्या किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
दरम्यान विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. अद्यापही विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मान्सूनला सुरुवात झाली नाही. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत मान्सूनला या भागातही सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे.
राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

No comments:

Post a Comment