Wednesday, June 29, 2022

जाता-जाता अजितदादांचा कामाचा धडाका ; 1690 कोटींची कामे मंजूर ;

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. परंतु, राजीनामा देण्याआधी महाविकास आघाडी सरकारने धडाधड निर्णय घेतले आहे. मावळते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांमध्ये 1690 कोटींची कामं मंजूर केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आम्हाला निधी देत नाही, असा आरोप करून एकनाथ शिंदे आणि ३९ आमदारांनी बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अखेरीस कोसळले आहे. पण अजित पवारांवर निधी न देण्याचा आरोप होत असला तरी मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी धडाधड निर्णय जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे ढग निर्माण झाले होते, त्या दोन दिवसांमध्ये अजित पवार यांनी १२९६ कोटी निधी वाटपाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, एकट्या पुण्यात १,६९० कोटींच्या कामांची मंजुरी दिली आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिलंय
मागील काही दिवसांपासून सरकार राहणार की जाणार अशी चर्चा रंगली असतानाही अजित पवार हे आपल्या कामात व्यस्त होते. नियमितपणे अजित पवार बैठका घेऊन निर्णय घेत होते. विशेष म्हणजे, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या क्वारंटाईन आहे. पण, तसं असलं तरीही अजित पवार यांनी शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. मागील दोन दिवसामध्ये पुणे जिल्ह्यासाठी अजितदादांनी भरघोस निधी दिला आहे. पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे.
१६०९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहेत. पुणे जिल्ह्यासाठी एकूण १२९३ कोटींची मंजुरी दिली आहे. यामध्ये जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासासाठी ३४९ कोटी, संभाजी महाराज समाधी स्थळ विकासासाठी २६९ कोटी आणि नगरपालिका, परिषदा, पंचायतींसाठी ६७५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारनेही मागील काही दिवसांमध्ये १६० पेक्षा जास्त जीआर काढले आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून याबद्दल तक्रार केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी याबद्दल खुलासा मागवला आहे.

No comments:

Post a Comment