वेध माझा ऑनलाइन - चुरशीने रंगलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप देखील विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे
दरम्यान काँग्रेसची तीन मतं फुटली असून मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण नऊ उमेदवारांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
No comments:
Post a Comment