वेध माझा ऑनलाइन - येथील नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरातील पंधरा प्रभागांमधील मतदार याद्या आज प्रसिद्ध केल्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी या याद्यांमधील महत्वाच्या झालेल्या चुकांकडे लक्ष वेधले आहे त्यांनी निवेदन देऊन याबाबत पालिका प्रशासनाला योग्य ती सूचनादेखील केली आहे
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की शहरातील नगरपरिषदेच्या निवडणूकी संदर्भातील जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार मतदार प्रारुप यादी प्रसिद्ध झाली आहे यामध्ये प्रभागात समाविष्ट भाग व यादी मधील समाविष्ट मते यामध्ये तफावत दिसून येत आहे आहे तरी आपण यामधील तफावत लक्षात घेऊन त्यामध्ये योग्य ती दुरुस्ती करावी
दरम्यान या याद्यांबाबत काही सूचना किंवा हरकती असतील तर 27 जूनपर्यंत कराड नगर परिषद कार्यालयात त्या दाखल करावयाच्या आहेत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे
No comments:
Post a Comment