Tuesday, June 28, 2022

उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना फोन केला होता ! फडणवीस यांनी उचलला नाही! ; बातमी काय आहे?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेवर मोठे संकट आले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी होते, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण, फडणवीस यांनी फोन उचलला नाही.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून याच्या पाठीमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फोन केला पण तरीही फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही

विशेष म्हणजे, असाच प्रकार २०१९ झाला होता. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन कऱण्यास नकार दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांशी फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment