Saturday, November 5, 2022

बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम 58 टक्के पूर्ण ; स्मारक प्रेरणा देणारे ठरेल ; ठाकरे यांचे गौरोवोद्गार...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत माहिती दिली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम 58 टक्के पूर्ण झाले असून हे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले.

मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, दादरमधील मुंबई महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांच्या आठवणी. फोटो असतील. या स्मारकाचे बांधकाम ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता करण्यात आलेले आहे.

बाळासाहेबांची भाषणं जनतेला जागृत करणारी आहेत. बाळासाहेबांची भाषणं जुनी भाषण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्मारक कधी होणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. आम्ही स्मारकासाठी एकही झाड तोडलं नाही. स्मारकासाठी अनेक बैठका घेतल्या. स्मारकाबाबत सर्व परवानग्या घेतल्या आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे ठाकरे यांनी म्हंटले.

No comments:

Post a Comment