Saturday, November 5, 2022

पक्षाच्या मंथन शिबीरास पवारांची हजेरी ; त्यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयात आहेत उपचार सुरु ; केवळ पाच मिनिटे संवाद साधला ;

वेध माझा ऑनलाइन - राजकारणातील एक पॉवरफुल नेते म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख आहे. ते सध्या आजारी असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुसरीकडे शिर्डीत पार पडत असलेल्या पक्षाच्या मंथन शिबीरास पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. तसेच त्यांनी आज आपलं भाषण उभं न राहता बसूनच केले. हाताला बँडेज लावलेल्या पॉवरफुल पवारांनी कार्यकर्त्यांशी केवळ पाच मिनिटे संवाद साधला.

शिर्डीत कालपासून सुरु झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरास आज पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने ते या शिबिरास उपस्थित राहतील का? अशी चर्चा केली जात होती. मात्र, त्यांनी प्रकृती नाजूक असताना देखील शिबिरास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.”तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल अशी आशा आहे, असा कानमंत्र यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

No comments:

Post a Comment