वेध माझा ऑनलाइन - पन्नास हजारांची लाच मागणाऱ्या विक्रम शिवदासला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रम शिवदासवर कारवाई केली होती न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली
तक्रारदाराच्या भाचीचा कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी कराड तहसील कार्यालयातील विक्रम शिवदास यांनी तब्बल पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून विक्रम शिवदास याचेवर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती कुणबी दाखला काढून देण्यासाठी विक्रम शिवदास यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी विक्रम शिवदास याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे..
No comments:
Post a Comment