वेध माझा ऑनलाइन - मागच्या 56 दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमीत्ताने भारत भ्रमंती दौरा करत आहेत. दरम्यान मागच्या आठवड्यापासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणात आली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडी यात्रा आज सकाळी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून पुन्हा सुरू झाली. या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही या यात्रेत सामील होत आहेत. दरम्यान गर्दीत धक्काबुक्की झाल्याने महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री नितीन राऊत याना गंभिर दुखापत झाली आहे.
महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भारत जोडो यात्रेदरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे ते खाली पडले. दरम्यान त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच हाताला आणि पायालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment