वेध माझा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासगी दौऱ्यानिमित्त आपल्या जन्मगावी दरे ता,महाबळेश्वर येथे आले होते यावेळी कराडच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी संदर्भात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सचिव रणजीत पाटील नाना व सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तसेच या स्मारकाचे क्ले मॉडेल त्यांना दाखवले मुख्यमंत्र्यांनी स्मारकाचे उभारणीचा आढावा रणजीत पाटील नाना यांच्याकडून घेतला. बाळासाहेबांची शिवसेना चे गट नेते आमदार भरत शेठ गोगावले यावेळी उपस्थित होते
स्मारक समितीचे सचिव रणजीत पाटील नाना यांच्यासह अँड दीपक थोरात , प्रताप इंगवले,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष काकासाहेब जाधव, महेश पाटील, सुनील शिंदे, सचिन राऊत, सागर शिंदे , गणेश पवार आदींनी दरे येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली . समितीच्या सदस्यांनी दरे येथे जाताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे क्ले मॉडेल बरोबर घेतले होते.आणि त्या क्ले मॉडेल चे सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी या स्मारकाची सविस्तर माहिती घेत या भव्य प्रकल्पाचे कौतुक केले.
स्मारक समितीतर्फे रणजीत पाटील नाना यांनी स्मारकाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली तसेच या स्मारकाचे उभारणीसाठी सर्व परवानग्या बरोबर जिल्हाधिकारी सातारा यांची ही परवानगी मिळालेली आहे हे समिती तर्फे सांगण्यात आले तसेच या स्मारकाच्या भूमिपूजनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले त्यास आश्वासीत करताना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण लवकरच स्मारकाच्या भूमीपूजनासाठी या वर्षीची तारीख निश्चित करू तसेच कराड मध्ये होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी शासन पातळीवर ही सहकार्य करू अशी ग्वाही दिली. सदरचे स्मारक हे भव्य व्हावे या दृष्टीने लागेल ती कोणत्याही प्रकार ची मदत करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली. रायगड महाड चे आमदार भरत शेठ गोगावले यांनीही हे स्मारक राज्यातील भव्यदिव्य स्मारक ठरेल असा विश्वास व्यक्त करत स्मारक उभारणीस बाळासाहेबांची शिवसेना गटातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले .....
No comments:
Post a Comment