वेध माझा ऑनलाईन - अमृतसर येथे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर शुक्रवारी दिवसा ढवळ्या गोळी झाडल्याची घटना घडली आहे. गोपाल मंदिराबाहेर कचऱ्यात देवांचीच्या मूर्ती सापडल्याच्या विरोधात शिवसेना नेते सुरी हे मंदिराबाहेर धरणे आंदोलन करत होते. याच वेळी गर्दीतून कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी केली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासूनच सुधरी सूरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली जात होती, असे समजते. पोलिसांनीही गेल्या महिन्यातच काही गँगस्टर्सना अटक केली होती. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीतच आरोपींनी याचा खुलासा केला होता.
No comments:
Post a Comment