वेध माझा ऑनलाइन - आमच्या उठावाला अजितदादा बेईमानी हा शब्द वापरत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्याविषयी अशी वक्तव्ये सहन करणार नाही, अजित दादांनी बोलताना खबरदारी घ्यावी, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.मरळी (ता. पाटण) येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, अजित पवार दादा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत असे बोलले की... जिथे शिंदे राहिले- वाढले तिथेच त्यांनी बेईमानी केली.. त्यांनी मुख्यमंत्र्यावर ही नाहक टीका केली आहे. शिंदे साहेबांचा समर्थक, चाहता म्हणून हे बोललेलं आम्हांला कुणालाही सहन झालेलं नाही. आम्ही आणि शिंदे साहेबांनी बेईमानी कधीच केलेली नाही. उलट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिदुत्वाचे विचार आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जपण्याचे काम केले आहे.
अजितदादांनी बेईमानी केली नव्हती का?
पाठीमागच्या काळात 48 तासाच सरकार जे तुम्ही केलं होत. ती बेईमानी नव्हती का?. पहाटेचा शपथविधी करताना तुम्ही शरद पवार साहेबांची परवानगी घेतली होती का?. त्यांना विचारल होत का असा जर प्रश्न आम्ही तुम्हांला विचारल तर तुम्हांला आवडणार नाही, असा प्रतिहल्ला देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांच्यावर यावेळी केला.
No comments:
Post a Comment