वेध माझा ऑनलाइन - कराडच्या कृष्णा पुलावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने नदीपात्रात उडी मारल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान उडी मारलेला विद्यार्थी अद्याप सापडला नसल्याने कृष्णा पुलासह कॉलेज रोडवर प्रचंड गर्दी झाली आहे
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या कृष्णा पुलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांनी नदीपात्रात उडी मारल्याची घटना घडली शनिवारी दुपारी घडली या प्रकारामुळे कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक जणांनी कृष्णा पुलावर धाव घेतली आहे तर अनेक विद्यार्थी कृष्णा पुलाच्या खाली नदी पात्रात त्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत पुलावर पोलीस बंदोबस्त दाखल झाला आहे आणि वाहतूक पोलीस ही तैनात आहेत दरम्यान,त्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे मात्र बघ्यांची गर्दी वाढत असल्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली आहे सदर विद्यार्थी कोणत्या गावचा त्याचे नाव काय हे अध्याप समजू शकले नाही
No comments:
Post a Comment