Tuesday, November 1, 2022

गुड न्युज! ; पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता ;

वेध माझा ऑनलाइन - वाहन चालकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आता पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याचा फायदा देशातील इंधन विक्रीवर होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिका निवडणुका देखील येत्या काळात जाहीर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात गेल्या 24 तासांत फारसा चढउतार दिसून आला नाही. बुधवारी सकाळी बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दरही स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज जारी केलेल्या दरामध्ये फारसा बदल झालेला नाही.
राजस्थाना राज्यातील दोन शहरांमध्ये पेट्रोल डिझेल खूप जास्त महाग झालं आहे. तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

No comments:

Post a Comment