वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. एवढेच नाही, तर शिवसेनेवर बेईमानीचा आरोप करत त्यांनी या बेईमानीचा बदला घेतल्याचे आज म्हटले आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
दरम्यान मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांत मतभेद झाले. यानंतर उद्धव ठाकरे महाआघाडीतुन मुख्यमंत्री बनले. पण यानंतर, गेल्या जून महिन्यात शिवसेनेत मोठे बंड झाले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीस म्हणाले, ज्या पद्धतीने शिवसेनेने आमच्यासोबत बेईमानी केली होती. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आम्ही निश्चितपणे पुन्हा येण्याची संधी शोधतच होतो. आम्ही काही येथे तपस्या करण्यासाठी किंवा साधू संत होण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे आमच्यासोबत बेईमानी झाली तर आम्ही त्याचे उत्तर देणारच. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की जी बेईमानी झाली त्याचा बदला आता आम्ही घेतला आहे...त्याचे योग्य ते उत्तरही आम्ही दिले आहे असेही फडणवीस म्हणाले
No comments:
Post a Comment