Monday, May 15, 2023

विधानसभा अध्यक्ष म्हणतात ...16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयाची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल ! ...

वेध माझा ऑनलाइन । सत्ताधारी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी केले. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नार्वेकर यांनी काही माध्यमांशी बातचित केली आणि आमदारांच्या अपात्रतेबद्दल माहिती दिली.

काय म्हणाले नार्वेकर?
माझा दौरा व्यवस्थित पार पडला असून वेळेत परत आलो. निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न असेल. पार्टी आणि त्या संदर्भात न्यायालयाने निकाल दिला आहे. लवकर निर्णय देण्याच्या मागण्या केल्या जातात. मात्र, कायद्यात काही तरतुदी असतात, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. नियमाच्या आधारावर, न्यायालयाच्या आधारावर आणि संविधानाच्या आधारावर निर्णय होईल. उपाध्यक्षांकडे काय अधिकार असतात, ते त्यांना माहित आहे. अध्यक्षपद रिकामं असेल तरच उपाध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकार असतात. मला माझे अधिकार माहित आहे, असंही नार्वेकर म्हणाले.
प्रक्रिया लवकर झाली तर 15 दिवसात निर्णय होईल. प्रक्रिया लांबली तर निकाल पुढे जाण्याची शक्यताही अध्यक्षांनी वर्तवली आहे. सभागृहाचा माझ्यावर विश्वास असल्याने मी या पदावर आहे. मी संविधानाच्या अधिकारात राहून निर्णय घेईल, त्यामुळे निश्चित राहावे. याचिका दाखल झाल्यापासूनच प्रक्रिया सुरू झालेली आहे. राजकीय पक्ष कोणता आणि व्हिप या संदर्भात न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, मी धमक्यांना भीक घालत नाही. अपात्रता निर्णय हा कायदा आणि नियमानुसार घेणार आहे. उपाध्यक्ष यांचे अधिकार मर्यादित आहेत. सर्व बाजू तपासल्या जातील. प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. कालमर्यादेबाबत आता बोलणं उचित नाही. विधिमंडळ अध्यक्ष म्हणून मला कोणताही राजकीय पक्ष महत्वाचा नाही तर कायदा महत्वाचा, असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.



No comments:

Post a Comment