Monday, May 15, 2023

क्रेडाई कराडच्या नूतन अध्यक्षपदी अप्पासाहेब पवार ; उपाध्यक्षपदी सूर्यकांत काटू सचिव पदी सुनिल कुलकर्णी तर तनय जाधव यांची खजिनदार पदी निवड ;

वेध माझा ऑनलाइन । क्रेडाई कराडचा सन २०२३-२५ पदग्रहण समारंभ बुधवार दिनांक २६ एप्रिल रोजी  संपन्न झाला.क्रेडाई कराडच्या नूतन अध्यक्षपदी अप्पासाहेब पवार यांची निवड झाल्याचे काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले क्रेडाई च्या एकूणच कामाचे स्वरूप व कामात येणाऱ्या अडचणी यावेळी राजेंद्र यादव आप्पासाहेब पवार व महेश पाटील यांनी सविस्तरपणे बोलून दाखवल्या

दरम्यान झालेल्या पद्ग्रहण समारंभास कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील,  क्रेडाई नॅशनलचे माजी उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया,  क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजीव पारिख, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सन २०२१-२३ चे अध्यक्ष श्री. महेश पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी कराड विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे बांधकाम परवानगी आठ महिने प्रलंबित होती. त्यावेळी क्रेडाई कराडने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा घेतला व त्यानंतर बांधकाम परवानगी मिळू लागली, तसेच क्रेडाई कराडने घेतलेले रक्तदान शिबीर, कराडमध्ये पहिल्यांदाच दहा ते पंधरा फुटाच्या झाडाचे वृक्षारोपण याचा विशेष उल्लेख केला. तसेच वेळोवेळी सदस्यांचा अडचणी सोडविण्या करीता शासन दरबारी केलेल्या पत्रव्यवहार चा लेखाजोखा मांडला. 

दरम्यान सदर कार्यक्रमांमध्ये आप्पासाहेब पवार यांनी क्रेडाई कराडच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. सूर्यकांत काटू उपाध्यक्ष, सुनिल कुलकर्णी सचिव, तर तनय जाधव यांनी खजिनदार पदाचा पदभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी सन २०२३-२५ करीतचा अजेंडा सभासदा पुढे मांडला.
कार्यक्रमा मध्ये राजेंद्र यादव, राजीव पारिख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील, शांतीलाल कटारिया यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. सुनिल कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी अप्पासाहेब पवार यांनी सहायक सचिव प्रतिक जाधव, अधिकराव पवार, दिगंबर माळी, कुलदीप मोहिते, प्रकाश वत्रे, संजय ओसवाल, धैर्य बदीयानी व स्वानंद पेंढारकर यांची संचालक
पदी नावे जाहीर केली. तसेच वूमनस विंग कनवेनर पदी सोनाली धोपटे, वूमनस विंग को कनवेनर पदी माधुरी कदम, युथ विंग कनवेनर पदी धैर्यशील यादव, युथ विंग को-कनवेनर पदी ओंकार कुंभार, युथ विंग डायरेक्टर पदी मिहीर राजमाने व नयन पाटील याची नावे घोषित केली. यावेळी क्रेडाई कराड चे सभासद बहुसंखेने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment