वेध माझा ऑनलाइन ; केरळमध्ये प्रवासी बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ बोट उलटली. या दुर्घटनेनंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य अजूनही सुरु आहे.
रविवारी हा अपघात झाला. बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रादेशिक अग्निशमन परिक्षेत्र अधिकारी शिजू केके यांनी सांगितले की, बोटीत नेमके किती लोक होते हे समजू शकले नाही.
No comments:
Post a Comment