वेध माझा ऑनलाइन ; कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बजरंग दलावर बंदीबाबत जाहीरनाम्यात उल्लेख केला होता. त्यावर आक्षेप घेत भाजपने जोरदार हल्लाबोल केला होता.कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुंसडी मारली असून शंभरहून जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू असून यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार हा हनुमानाच्या मुद्द्यावरुन गाजत होता. त्यावेळी काँग्रेसने घेतलेली भूमिका भाजपने त्यांच्याविरोधात उलटवली होती हनुमानाचा मुद्दा काँग्रेस आणि भाजप दोन्हींकडून मोठ्या प्रमाणावर प्रचारात एकमेकांवर टीका करण्यासाठी वापरला गेला होता
No comments:
Post a Comment