Wednesday, May 3, 2023

कराडातील हिंदुत्ववादी नेते विक्रम पावसकर यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड ; राज्यभरातून त्यांच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव ;


वेध माझा ऑनलाइन : 
कराडातील प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व राज्य सचिव विक्रम पावसकर यांची नुकतीच प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केले आहे आजच त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे

विक्रम पावसकर यांची प्रखर हिंदुत्ववादी म्हणून कराडसह संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात ओळख आहे भाजप चे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांची कारकीर्द उठावदार पणे कार्य करणारी ठरली आहे त्यांचे पक्ष संघटनेचे प्रभावशाली काम पाहून भाजप ने सलग दोनदा त्यांना जिल्हाध्यक्ष पदी विराजमान केले होते त्यानंतर राज्याचे सचिवपदी त्यांची वर्णी लागली होती आज त्यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे 

हिंदू एकता आंदोलन व भाजप च्या माध्यमातून विक्रम पावसकर यांनी मागील कोरोना काळात केलेलं काम खूप मोठं आहे  गरजु लोकांना सर्व प्रकारची मदत त्याकाळात त्यांनी केलीच तसेच त्यांनी उभे केलेले मोफत कोविड सेंटर त्यावेळी अनेकांना कोविडच्या आजारातून जीवदान देण्यासाठी कारणीभूत ठरले सध्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पेजवर विक्रम पावसकर यांचा हिंदुत्ववादी छावा असा उल्लेख करत त्यांचा गौरव केला होता 
पालिकेत नगरसेवक असताना विक्रम पावसकर यांनी नगरपरिषदेच्या फ़ंडिंग ची वाट न बघता स्वखर्चाने केलेल्या शहरातील रस्त्याच्या कामाची आजही चर्चा होत असते त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालिकेला निधी उपलब्ध करून देत शहराच्या विकासासाठी आपली बांधीलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे शहरासह तालुक्यात देखील त्यांचे विकास कामांसाठीचे प्रयत्न सुरू असतात... 
शिवजयंती उत्सव राज्यात नावारूपास आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे युवकांचे आयडॉल व ज्वलंत  हिंदुत्ववाद जोपासणारे म्हणून ते जिल्ह्यात व राज्यात ओळखले जातात लव्ह जिहाद विरोधात त्यांचे कार्य राज्यभरात जोरदारपणे सुरू आहे कराडात त्यांनी काढलेल्या लव्ह जिहाद विरोधातील भव्य मिरवणूकी राज्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत त्यांच्या एकूणच सामाजिक कार्याची दखल घेत तसेच त्यांची संघटनात्मक कामाची पावती म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांची नुकतीच  प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्यासह राज्यभरातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

No comments:

Post a Comment