Sunday, May 14, 2023

ठाकरे गट ऍक्शन मोड मध्ये , शिंदे गटाचे टेन्शन वाढले ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन ।ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज विधानसभा सचिवांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्ययालयानं राज्याच्या संत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात  आहे. अनिल परब हे आज सचिवांची भेट घेणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे पालन करून आपत्र आमदारांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी परब सचिवांना निवेदन देण्याची शक्यता आहे.

सचिवांना निवेदन देण्याची शक्यता 
शिवसेनेतील 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं विधान सभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधान सभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलंय. त्यातच आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब विधान सभा सचिवांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अपात्र आमदारांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा मागणीचं निवेदन ते सचिवांना देण्याची शक्यता आहे.


No comments:

Post a Comment