वेध माझा ऑनलाइन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्राचे आज साताऱ्यात आगमन झाले. तत्पूर्वी शिवराज चौकात या पद यात्रेच्या वतीने यावेळी रास्ता रोको करण्यात आले.
त्यानंतर पदयात्रा बॉम्बे चौकातून शहरातील पोवई नाका येथे आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. आज ही यात्रा साताऱ्यात दाखल झाली. तत्पूर्वी खिंडवाडी ते शिवराज पेट्रोलपंपाच्या दरम्यान, यात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडली.
दरम्यान या पदयात्रेविषयी माहिती देताना खोत कराडात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की आम्ही सुरुवातीला सातारला चालत जाऊ... तोपर्यंत आमची दखल घेतली तर ठीक... नाहीतर... वाहनाने पुढे मुंबईला आम्ही जाणार आहोत... व सरकारचे लक्ष वेधणार आहोत... याचाच अर्थ या आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्याने इतर वाहतूक व नियमित रस्त्यावरील दळणवळण याला यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो... त्यानिमित्ताने आमच्याकडे सरकारचे लक्ष जाईल असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता... आणि त्याच मार्गाची सुरुवात करताना आता ते दिसत आहेत... त्याचाच भाग म्हणून त्यांनी अचानक रस्त्यातच आपला ठिया मांडून पोलीसांची तारांबळ उडवली?... दरम्यान, यावेळी खोत म्हणाले, या तीन दिवसात सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देईल अशी आशा आहे. नाही तर आम्ही वाहनांने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत.
No comments:
Post a Comment