Thursday, May 25, 2023

सातारा जिल्हा म. न. वि. से.च्या वतीने कराडच्या एस टी आगार प्रमुखांना विविध मागण्यांचे निवेदन ; वेळेत मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने करणार आंदोलन ; जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्हा मनवीसेच्या वतीने कराडच्या एस टी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये  महिलांना एस टी स्वछता गृह वापरासाठी होत असलेली 5 रुपये आकारणी रद्द व्हावी तसेच विद्यार्थ्यांसाठी एस टी बसेसच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल कराड एस टी आगाराने संबंधित तालुक्यातील विभागासाठी बसेसची त्वरित सुविधा सुरू करावी आणि नागरिकांना व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था त्याठिकाणी त्वरित करावी या प्रमुख मागण्या जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी निवेदनातून केल्या आहेत
निवेदनात म्हटले आहे की, कराड पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना एस टी बसेसच्या होणाऱ्या गैर सोयीमुळे येण्या जाण्यासाठी बराच वेळ वाट पाहत बसावे लागते रविवारी तालुक्यातील अनेक ठिकाणचे विदयार्थी क्लासच्या निमित्ताने कराड येथे येत असतात त्यांना देखिल तासन्तास बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते तालुक्यातील मसूर भागातील अनेक विद्यार्थी कराडात शिक्षणासाठी येत असतात त्याठिकाणी देखील बसेस फेऱ्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून आलेली बस मिळवण्यासाठी पळापळ करावी लागते या एकूणच परिस्थितीचा विचार करून संबंधित आगर प्रमुखांनी याबाबतीत त्वरित उपाययोजना कराव्यात प्रवासी नागरिक व विद्यार्थी याना त्याठिकाणी बसण्यासाठी  बाकडी उपलब्ध करून द्यावीत 
कराडच्या एस टी आगार मध्ये महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छता गृहाच्या वापरासाठी 5 रुपये आकारणी केली जात आहे ती त्वरित बंद झाली पाहिजे या सर्व मागण्यांचे निवेदन मनविसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी नुकतेच कराड आगर प्रमुखांना दिले आहे वेळेत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे

No comments:

Post a Comment