आज सायंकाळच्या दरम्यान येथील घाटावरील स्वछतागृहमध्ये स्वछता नसते असा मेसेज या ग्रुपवर एका सुज्ञ नागरिकाने फोटोसाहित टाकला त्याचवेळी... कळवले आहे... असा मेसेज एडमीन चव्हाण यांनी ग्रुपवर टाकला... आणि मोजून तासाभराच्या अंतराने त्या स्वछतागृहमध्ये असणारी सर्व घाण स्वच्छ करून त्यामधील चोक-अप काढले गेल्याचे नगरपालिका मुकादम श्री मारुती काटरे व त्यांच्या सर्व टीमने लग्गेच कळविले... एडमिन चव्हाण यांनी त्यांचे आभारही मानले...
थोडक्यात , कोणतेही काम असो... इतक्या पटकन लोकांच्या कोणत्याही तक्रारीला या ग्रुपच्या माध्यमातून रिझल्ट आता मिळू लागला आहे... हे या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल... वीज पाणी रस्ते यासह शहर व परिसरातील कोणतेही आणि कसलेही सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी शहरातील लोकांसाठी "मसीहा' म्हणून काम करणारा हा सामाजिक ग्रुप बनला आहे... अशी नागरिकांची भावना आहे...या ग्रुपच्या मार्फत असे अनेक प्रश्न यापूर्वी सुटले आहेत यापुढे देखील नक्कीच सुटतील...आणि कराडकर नागरिकांना याची खात्रीही आहे... यामुळेच आपले कराड ग्रुपचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे...
No comments:
Post a Comment